The Wayback Machine - https://web.archive.org/web/20131001221053/http://www.shirpur.in/
g
मुख्य पान शिरपूर शहर पर्यटन शैक्षणिक आर्थिक बस आणि रेल्वे वेळापत्रक मनोरंजन आमच्याविषयी संपर्क
 

शिरपूर तालुक्याच्या Website वर आपले स्वागत आहे

 

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सीमेवर, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर, सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी, तापी, अरूणावती, अनेर नद्यांच्या प्रदेशातील हा शिरपूर तालुका. इ.स. १२ व्या व १३ व्या शतकात तालुक्यातील थाळनेर हे गाव निजामांच्या राजधानीचे गाव होते येथील भुईकोट किल्ला इतिहासाची साक्ष देत आहे. शिरपूर तालुक्याच्या आर्थिक विकासाचा प्रमुख शेतकरी आहे. स्वातंत्र्य संग्रामात झोकून देणारे ज्येष्ठ स्वा.सै. कर्मवीर व्यंकटराव रणधीर, कै. शंकर पांडू माळी, कै. उत्तमराव गिरधर पाटील, कै. लीलाताई उत्तमराव पाटील, शिवाजीराव गिरधर पाटील, कै. दादुसिंग राजपूत, कै. पोपटराव चिंधू मराठे हे सर्व शिरपूरचेच. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील शिवाजीराव पाटील, उत्तमराव पाटील, रामदास पाटील यांचे योगदान तितकेच मोलाचे आहे. कै. ग.द. माळी गुरुजी, कर्मवीर व्यंकटराव रणधीर, शिवाजीराव पाटील, कै. इंद्रसिंग राजपूत, कै. प्रल्हादराव पाटील, संभाजीराव पाटील, अमरिशभाई पटेल, काशीराम पावरा यांनी विधानसभेत शिरपुरचे प्रतिनिधित्व केले.

मा.आ. श्री. अमरिशभाई पटेल सर्वात जास्त म्हणजे सतत २० वर्षे व नंतर विधानपरिषदेवर ६ वर्षे आमदार राहण्याचे भाग्य यांच्या वाटयाला आले. आमदारकीच्या काळात त्यांनी अनेक विकासकामे केली. त्यांच्या नेत्रत्वाखाली शिरपूर-वरवाडे नगरपरिषद राज्यात एक आदर्श नगरपालिका आहे. शिरपूर नगरपालिकेला संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानाचा राज्याचा प्रथम क्रमांकाचा २५ लाखांचा पुरस्कार दोन वेळा मिळालेला आहे. भारत आणि जगात प्रसिद्ध असलेल्या प्रियदर्शिनी सहकारी सुतगिरणी, शिरपूर गोल्ड रिफायनरी शिरपुरच्या विकासात महत्वाची भूमिका बजावतात. कै. खासदार मुकेशभाई पटेल यांनी तर आपल्या खासदारकीचा मिळणारा विकासाचा संपूर्ण निधी शिरपूर शहराच्या विकासासाठी दिला आहे.

महाराष्ट्रात शिरपूर शहर हे एक अतिशय विकसित आणि सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज शहर आहे. नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी शिरपूर सुंदर, स्वच्छ, हरित करून टाकले आहे. या शहरात नागरी सुविधा शहरवासियांना मिळत असल्याने कामासाठी बाहेरून येणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढले आहे. शांतता, जातीय धार्मिक सलोखा, विकासाला स्थान यामुळे बाहेरून कुटुंब या शहरात राहण्यासाठी येत आहेत.शिरपूरला हरित शहर म्हणून ओळखले जाते. पिण्याच्या पाण्यासाठी इतरत्र टंचाई शिरपूर तालुक्यात पाण्याची टंचाई नाही. लोकसंख्येत वाढ झाली तरी पाणी कमी पडणार नाही असे नियोजन द्रष्टे लोकप्रतिनिधी आमदार अमरिशभाई पटेल यांनी केले आहे. आमदार अमरिशभाई पटेल यांनी मतदारसंघातील मतदारांचा अपघाती विमा उतरविला आहे. आरोग्य, शिक्षण, कृषी, जलसिंचन या क्षेत्रात शिरपूर तालुका सर्वात पुढे आहे.

महत्वाच्या वेबसाईट (शिरपूर)

आर.सी.पटेल इंजिनियरिंग कॉलेज

आर.सी.पटेल फार्मसी कॉलेज

आर.सी.पटेल कॉलेज ऑफ एज्युकेशन 

आर.सी.पटेल ज्युनीअर कॉलेज ऑफ एज्युकेशन

एच.आर.पटेल फार्मसी कॉलेज

आर.सी.पटेल आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेज

आर.सी.पटेल आय.एम.आर.डी. कॉलेज

एस.पी.डी.एम. कॉलेज शिरपूर

फार्मसी कॉलेज बोराडी

शिरपूर गोल्ड रिफायनरी

द्वेता गारमेंट्स शिरपूर

दिसान टेक्स शिरपूर

परम टेक्स शिरपूर

दिसान ग्रुप शिरपूर

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव

 

 

 


Welcome To Shirpur1.com

खान्देश बातम्या  

 

 

शिरपूर तालुका

क्षेत्रफळ(चौ.किमी.) २३६४.५३

लोकसंख्या : ३३७५६३

पुरूष : १७२७९७
महिला : १६४७६६
घनता : १४३

गावांची संख्या : १४७
ग्रामपंचायत : ११८

आरोग्य

रुग्णालये ०३

दावाखणे ०४

प्रसुतिग्रह ०२

प्रा.आ.केंद्र ०८

उपकेंद्र ५७

डॉक्टर ५१

परिचारिका ११५

शिक्षण

प्रा.शाळा २६०

माध्यमिक ४४

उच्च माध्यमिक २०

महाविद्यालये ११

इतर

पोलीस ठाणे ०२

महसुल मंडळे ०७

बाजार समिती ०१

जि.प.सर्कल १२

साक्षरता ६६.३० %

Crimesamrat

 

 

 
     

 

 

 
©2012 Shirpur1.com
    [Home] [Contact us] [Advertise with us]
 
या website वरील कोणत्याही प्रकारची माहितीची copy किंवा नकल किंवा इतर website वर आढल्यास कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. Shirpur1.com